हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळा - शालेय उपक्रम
<<< Back to katraj marathi secondary page
हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेत पुणे म.न.पा. तर्फे कचरा समस्येविषयी उपक्रम
गुरूवार दि. १४ सप्टेंबर २०१७ रोजी पुणे म.न.पा., जनवाणी संस्था व स्वच्छ विभाग पुणे यांच्या
सहकार्याने स्वच्छ पुणे - सुंदर पुणे यासाठी कचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, शून्य कचरा व्यवस्थापन या
विषयी शॅार्ट फिल्म दाखविण्यात आली. या फिल्ममधून सुका व ओला कचरा वर्गीकरण कसे करावे, स्वच्छता
सेवकांचे कार्य, कचऱ्यातून वीजनिर्मिती, खत प्रकल्प, इंधन कसे तयार केले जाते, सुक्या कचऱ्यातून
पुनर्वापर कसा करायचा या संबंधी माहिती दाखविण्यात आली.
कचऱ्याच्या वाढत्या समस्यांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, पक्षी, प्राणी यांच्यावर होणारे वाईट परिणाम,
डंपिंग ग्राऊंड शेजारील गावात निर्माण होणारे आरोग्याचे, पाण्याचे प्रश्न व मातीचे प्रदूषण, वायू प्रदूषण या
संबंधीची जागृती व्हावी म्हणून ही शॅार्ट फिल्म दाखविण्यात आली. पुणे म.न.पा. चे प्रभागीय आयुक्त
मा. श्री. उदास साहेब यांनी मोबाईल द्वारे विद्यार्थिनींशी संवाद साधला.
या कार्यक्रमासाठी आरोग्य निरीक्षक श्री. उमेश ठोंबरे, सचिन बिबवे, जनवाणी संस्थेचे उमेश कसबे व त्यांचे
सहकारी श्री. प्रतिक कदम उपस्थित होते. या कार्यक्रमास मा. मुख्याध्यापिका विद्या गालिंदे व ज्येष्ठ शिक्षिका
विनिता फलटणे यांनी मार्गदर्शन केले.
स्वातंत्र्य दिन
मंगळवार दिनांक १५ ऑगस्ट २०१७ रोजी हुजूरपागा कात्रज शाळेत भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव व कात्रज प्राथमिक विभागाच्या शाळा समिती अध्यक्ष मा. श्रीमती शालिनी पाटील उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी कात्रज शाळेतील सर्व विभागांच्या मा. मुख्याध्यपिका, शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थिनी तसेच पालक व माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कात्रज प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती रंजना नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्गीत व ध्वजगीत गाऊन झेंड्याला मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सूर्यचंद्र रंगभूमीतर्फे घेण्यात आलेल्या समूहगीत स्पर्धेत पारितोषक मिळविलेल्या कात्रज प्राथमिक विभागाच्या शिक्षक व विद्यार्थिनी संघ तसेच कात्रज इंग्रजी माध्यम विभागाच्या शिक्षक व विद्यार्थींनी संघ यांचा सत्कार व कौतुक कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. श्रीमती शालिनी पाटील यांचा हस्ते करण्यात आले. यानंतर पारितोषक मिळविलेल्या प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी ”जय हिंद हिंद आनंद भुवन” हे समूहगीत सादर केले. तसेच प्राथमिक विभागाच्या विद्यार्थिनीनी “जागो मेरे भारतवासी” व माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी “लहर उठेगा ध्वज अपना” ही समुहगीते सदर केली. कात्रज शिशुमंदिर मराठी माध्यम विभागातील कु. अवनी बाचल या चिमुकलीने स्वातंत्र्यदिनाची माहिती व सध्या भारतासमोरील प्रश्न याविषयी सुंदर भाषण केले व उपस्थितांची मने जिंकली. यासाठी तिचे विशेष कौतुक मा. श्रीमती शालिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कात्रज माध्यमिक विभागातील शालेय मंत्रीमंडळाची अध्यक्ष कु. मानसी पेटकर हीने आपले मनोगत व्यक्त करताना भारताची वैज्ञानिक व तंत्रज्ञानातील प्रगती, भारतासमोरील भ्रष्टाचार व बेरोजगारी यासारखे प्रश्न तसेच पाण्याचा काटकसरीने वापर, स्वच्छता व पर्यावरण जनजागृती याविषयी तिचे मत मांडले. त्यानंतर कात्रज प्राथमिक विभागातील शालेय मंत्रीमंडळाची अध्यक्ष कु. धनश्री निकम आपले मनोगत मांडताना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरचा भारत याविषयी आपले मत मांडले व नवीन युगात माणुसकीचा शोध घेण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मा. श्रीमती शालिनी पाटील यांनी मार्गदर्शन करताना ”नौजवान सैनिका, उचल पाऊला, पुढे पुढे चला, ध्वनी निनादला” हे देशभक्तीपर गीत सादर करून सीमेवरील सैनिकाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच बाजारपेठेत येणाऱ्या चीनी बनावटीच्या वस्तू खरेदी करणार नाही व वापरणार नाही असा संकल्प या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रिया गोगावले यांनी केले. सर्व विद्यार्थिनींना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
शालेय स्वच्छता
हुजूरपागा कात्रज शाळेमध्ये दिनांक १४/०८/२०१७ रोजी संपूर्ण शाळा व शालेय परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये शाळेच्या मुख्याध्यपिका मा. श्रीमती गालिंदेबाई, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनीनी सहभाग घेऊन संपूर्ण शाळा व शालेय परिसर स्वच्छ केला. सर्व वर्गाच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थिनींचे गट करून वर्गखोली, कपाटे, खिडक्यांची स्वच्छता करून घेतली. शालेय इमारतीतील ३रा, ४ था व ५ वा मजला स्वच्छ करण्यात आला. तसेच शालेय परिसर देखील स्वच्छ करण्यात आला. या मध्ये कामाचे नियोजन करण्याचे काम मा. मुख्याध्यपिका श्रीमती गालिंदेव जेष्ठ शिक्षिका श्रीमती फलटणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती घोडके यांनी केले. त्या नियोजनानुसार १) वर्गखोली स्वच्छता- पंखे कपाटाची दारे स्वच्छ पुसली. कपाटातील अनावाश्यक साहित्यबाहेर काढले. २) खिडक्यांच्या काचा पुसून खिडक्यांच्या बाहेरील जाळ्यावरील कचरा काढला. लॉफ्टवरील कचरा व बेंचेस पुसले. वर्गखोलीचा दरवाजा, चौकाट व वर्गाची पाटी स्वच्छ पुसली. ३ऱ्या, ४थ्या व ५ व्या मजल्यावरील पॅसेज पुसून स्वच्छ करण्यात आला. ४थ्या मजल्यावरील मा. मुख्याध्यपिकांचे कार्यालय, संगणक कक्ष व मुख्याध्यपिका कार्यालयाशेजारील वर्गखोली यांची देखील स्वच्छता केली. ५ व्या मजल्यावरील गंथालय स्वच्छते अंतर्गत ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून कपाटांची दारे, काचा स्वच्छ पुसून घेतल्या. प्लेशेड, मैदानातील स्वच्छतागृह व शालेय आवाराची स्वच्छता सेवकांनी केली. सर्व वर्गामधून कचरा व अनावश्यक साहित्य सेवकांनी बाहेर काढले. स्वच्छ नीटनेटक्या शाळेच्या आवारात स्वातंत्र्यदिन साजरा करताना सर्वांनाच आनंद वाटला.
स्वराज्य सभा मंत्रिमंडळ शपथविधी
शनिवार दिनांक २२/०७/२०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता हुजूरपागा कात्रज प्राथमिक व माध्यमिक प्रशाला कात्रज येथे स्वराज्यसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती मा.श्रीमती सुजाता पवार व अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सभासद मा. श्री. रवींद्र साळुंखे, संस्थेच्या उपाध्यक्षा मा.उषाताई वाघ, माध्यमिक विभागाच्या मा.मुख्याध्यपिका श्रीमती विद्या गालिंदे, प्राथमिक विभागाच्याजेष्ठ शिक्षिका श्रीमती नूतन जवळेकर उपस्थित होत्या. मा. मुख्याध्यापिका श्रीमती गालिंदे व श्रीमती जवळेकर यांनी नवनिर्वाचित मंत्रिमंडळास गोपनीयतेचीअ पदाची शपथ दिली. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते मावळत्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रमुख पाहुण्या सुजाता पवार यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक वाटते असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी संजाचे हित साधून नेतृत्त्व करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रविंद्र साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती वैशाली महाले यांनी प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्षांची ओळख करून दिली.श्री प्रसाद दीक्षित यांनी आभार व्यक्त केले. श्रीमती ज्योत्स्ना पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमची सांगता झाली.
स्वराज्यसभा निवडणूक २०१७-१८
बुधवार दिनांक ५/०७/२०१७ रोजी हुजूरपागा कात्रज शाळेत ८वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींची स्वराज्यसभा निवडणूक घेण्यात आली. सर्व वर्गशिक्षकांनी निवडणुकीची पूर्व तयारी केली. प्रत्येक वर्गातून ४ सुयोग्य विद्यार्थिनींची नावे स्वराज्य सभा प्रतिनिधी म्हणून दिली. या प्रत्येक वर्गातील चार विद्यार्थिनी पैकी दोन विद्यार्थिनींची निवड गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली. त्यानंतर निवडून आलेल्या विद्यार्थिनीनीची निवड गुप्त मतदान पद्धतीने करण्यात आली नंतर निवडून आलेल्या विद्यार्थिनींना वेगवेगळ्या विभागाचे मंत्री पदे देण्यात आली. यामध्ये पंतप्रधान, उपपंतप्रधान, स्वच्छतामंत्री, शिस्तमंत्री, अभ्यासामंत्री, पर्यावरणमंत्री, नभोवाणीमंत्री अशा अनेक पदांचा पदभार देण्यात आला. शाळेची शिस्त व प्रगती होण्यसाठी व तसेच विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये नेतृत्त्व गुण विकसित करण्यामध्ये स्वराज्यसभा उपक्रमाचा वाट महत्त्वाचा असतो. मा. मुख्याध्यापिका श्रीमती गालिंदे यांनी सर्व वर्गाच्या निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली व निवडणूक अतिशय शिस्तीत व उत्साहाने पर पाडल्याबद्दल विद्यार्थिनींचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व शाबासकी दिली.
आंतरशालेय स्पर्धा
स्वामी विवेकानंद विचारमंचातर्फे दिनांक १/०८/२०१७ रोजी इयता १०वी च्या विद्यार्थिनींसाठी डॉ. हेडगेवार यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १० वी च्या कु. स्नेहा पांडे व गौरी अजगर या विद्यार्थिनी सहभागी झाल्या. या स्पर्धेत आपल्या प्रशालेला द्वितीय क्रमांक मिळाला.
आंतरवर्गीय स्पर्धा व उपक्रम
दिनांक १७/०७/२०१७ रोजी इयत्ता ८ वी तस १२ वी च्या विद्यार्थिनींची हस्ताक्षर व शुद्धलेखनाची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इ ८ वी व ९ वी च्या गटातून दोन क्रमांक तसेच १० वी व १२ वी च्या गटातून २ क्रमांक काढण्यात आले. इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींची नागपंचमीच्या आदल्या दिवशी २६/०७/२०१७ रोजी मेंदी स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये विद्यार्थिनीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. प्रत्येक इयत्तेतून ३ क्रमांक काढण्यात आले. रक्षाबंधन म्हणजेच बहिणीने भावाप्रती कृतज्ञता व प्रेम व्यक्त करण्याचा पवित्र सण. या सणानिमित्त दिनांक ८/८/२०१७ सदैव आमच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या बांधावांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी अग्निशामक दलाच्या कर्मचारयांना राखी बांधून साजरा केला. या प्रसंगी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांच्या उपकरणांची व कार्याची माहिती सांगितली. तसेच या वेळी इयता ८ वीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी मेमाणे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
वृक्षारोपण कार्यक्रम
शनिवार दिनांक १ जुलै २०१७ रोजी हुजूरपागा कात्रज शाळेत वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थीनींनी आणलेली कण्हेर, बदाम, पाम, मोगरा इत्यादी झाडांची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली. पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मा. श्रीयुत दिपक माळीसाहेब यांच्या हस्ते शाळेच्या मुख्य गेटजवळ कण्हेरीचे रोप लावण्यात आले. या कार्यक्रमासाठी म.ग.ए संस्थेचे पदाधिकारी, कात्रज हुजूरपागा शाळेतील सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, सेवक व विद्यार्थिनीं हजर होत्या. शाळेच्या आवारात वृक्षारोपण करताना विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.
पालक सभा
सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात आयोजित केलेल्या पालक सभा खालील प्रमाणे आहे.
वार | दिनांक | इयत्ता |
---|---|---|
मंगळवार | २७ जून २०१७ | १२ वी |
बुधवार | २८ जून २०१७ | १० वी |
गुरुवार | ६ जुलै २०१७ | ९ वी |
शुक्रवार | ७ जुलै २०१७ | ८ वी |
निकाल ( मार्च २०१७ )
१) १० वी – १००%
२) १२ वी - वाणिज्य – ९८.११%
व्यवसाय अभ्यासक्रम - १००% ( सलग ५ वर्ष )
अप्रगत विद्यार्थिनी मार्गदर्शन
अप्रगत विद्यार्थिनींसाठी परीक्षेच्या दिवसापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन शिक्षक करतात. या उपक्रमामुळे शाळेचा निकाल १००% लागण्यास हातभार लागतो.
स्वराज्य सभा
लोकशाहीची मुल्ये शिक्षणातूनच विद्यार्थिनींमध्ये रुजावी, या उद्देशाने हा उपक्रम घेतला जातो.
१) निवडणूक – गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक घेऊन मंत्रिमंडळाची निवड केली जाते.
२) शपथविधी – मंत्रिमंडळातील विद्यार्थीनींना अध्यक्ष, पंतप्रधान, उप - पंतप्रधान, अभ्यासमंत्री, स्वच्छ्ता मंत्री, शिस्त मंत्री या मंत्रीपदांची शपथ दिली जाते. त्या त्या पदानुसार विद्यार्थिनी शालेय कामकाजामध्ये सहभागी होतात.
EXPLORE: मोकळे व्हा!
९ वी च्या विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा उपक्रम राबवला जातो. हा उपक्रम एच्.एच्.सी.पी. हुजूरपागा लक्ष्मी रोड शाखेतील १९९३ - १० वी च्या बॅच मधील माजी विद्यार्थिनीं मार्फत राबवला जात आहे. या विद्यार्थिनी उच्चशिक्षित तसेच उच्चपदस्थ असून आपल्या कामातून बहुमुल्य वेळ काढून आमच्या विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतात. हा कार्यक्रम विद्यार्थिनी प्रिय आहे.
व्यवसाय अभ्यासक्रम
१) ON THE JOB TRAINING – शालेय शिक्षणा बरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी श्री शारदा सहकारी बँक, सोहम कॉम्प्युटर या ठिकाणी ON THE JOB TRAINING ही कार्यशाळा दर वर्षी घेतली जाते.
२) उद्योजकता विकास शिबीर - विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो. या अंतर्गत व्याखाने, प्रदर्शन व कार्यशाळा घेण्यात येतात.
DIGITAL CLASSROOM
रोटरी क्लब यांच्या सहाय्याने पहिली DIGITAL CLASSROOM शाळेत तयार करण्यात आली. या DIGITAL CLASSROOM चा वापर करून E - LEARNING च्या माध्यमातून मनोरंजनात्मक पद्धतीने ८ वी ते १० वी चा अभ्यासक्रम शिकवला जातो.
चित्रकला विभाग
या वर्षी झालेल्या चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजीएट या सरकारी गराडे परीक्षांमध्ये विद्यार्थीनींना खालील प्रमाणे यश मिळविले.
- एलिमेंटरी :: एकूण विद्यार्थिनी - २९, अ श्रेणी मिळालेल्या - ०५, निकाल - १००%
- इंटरमिजीएट :: एकूण विद्यार्थिनी - ४७, अ श्रेणी मिळालेल्या - ०२, निकाल - ९८%
सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या एलिमेंटरी परीक्षेत कु. नंदिनी मिटकरी हिने महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावला.
१ डिसेंबर जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींची एड्स विषयक जनजागृती या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
फुलोरा या शाळेच्या नियतकालीकासाठी मुखपृष्ठ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनीच्या चित्रास फुलोराच्या मुखपृष्टाचा मान मिळतो. या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
- क्र. १ कु. सृष्टी साळुंके १० वी अ
- क्र. २ कु. सेजल शेराल ९ वी ब
- क्र. ३ कु. प्रियांका मोरे ९ वी अ
- क्र. ४ कु. आकांक्षा कामथे ८ वी अ
वाचन प्रेरणा दिन
दिनांक १५/१०/२०१६ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ शिक्षिका मा. श्रीमती. विनिता फलटणे व मा. श्रीमती. मधुरा भागवत यांनी केले. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषांमधील साहित्यांचे वाचन करण्यात आले. या प्रसंगी कादंबरी, कथा, कविता, पत्र, पोवाडा या विविध लेखन प्रकारांचे वाचन करण्यात आले. तसेच या वर्षी सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या मा. कॅप्टन शिवाजी सावंत यांच्या "मृत्यंजय" या कादंबरीतील प्रकरणाचे वाचन करण्यात आले. या साहित्य प्रकारच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये वाचन प्रेरणा निर्माण करण्यात आली. तसेच दिनांक १७/१०/२०१६ रोजी आमच्या प्रशालेच्या पालक शिक्षक संघाने "वाचन प्रेरणा" दिन साजरा केला. या निमित्ताने पालकांनी विविध पुस्तकांचा अभ्यास करून साहित्यातील वैविध्य वाचनातून दाखविले. यामध्ये १० पालकांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला इतर पालक वर्ग व शिक्षक वर्ग प्रेक्षक म्हणून उपस्थित होता.
या कार्यक्रमास मा. मुख्याध्यापिका श्रीमती. सीमा झोडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
वाहतूक जनजागृती कार्यक्रम
गुरुवार दिनांक ६/१०/२०१६ रोजी पुणे शहर वाहतूक पोलीसांतर्फे वाहतूक नियंत्रणा विषयी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयी कात्रज चौकात व पुणे शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील एकूण १०० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
विद्यार्थिनींनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली व वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी घोषणा दिल्या. सर्व वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होतील व मानवाचे आयुष्य वाढेल अशा सूचना विद्यार्थिनींनी त्यांना दिल्या.
हुजूरपागा कात्रजच्या विद्यार्थिनींनी घेतली शिक्षण संघर्षाची अनुभूती
बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०१६ रोजी दैनिक सकाळ आणि महेश को ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने हुजुरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात “पायवाट” हा लघुचित्रपट दाखविण्यात आला. मा. श्री. मिथुनचंद्र चौधरी दिग्दर्शित या चित्रपटाला शैक्षणिक विभागात उत्कृष्ट लघुचित्रपट म्हणून सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ”सैराट” या चित्रपटाचे ते मुख्य सहाय्यक दिग्दर्शक असून त्यात त्यांनी छोटीशी भूमिका केली आहे. तसेच मास कम्युनिकेशन या विषयावर त्यांचे प्रभुत्व आहे. ग्रामीण भागातील मुलींना आपल्या शिक्षणात येणारे कौटुंबिक, नैसर्गिक अडसर दूर करीत शिक्षणाकडे जाणारी पायवाट स्वतः निर्माण करावी लागते. त्यांचा जीवन संघर्ष दाखविणारा हा चित्रपट आहे. यावेळी दिग्दर्शक मा. श्री. मिथुनचंद्र चौधरी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला. मुलींनी त्यांना चित्रपटाचे शीर्षक, चित्रपटाचा विषय तसेच समाजातील ही परिस्थिती बदलण्यासाठी आपली भूमिका काय असावी? या बाबत अनेक प्रश्न प्रियांका मोरे, वैष्णवी शिंगवी, श्रुतिका भावसार, स्नेहा पाडे, ममता उणेचा, मयुरी मारणे या व इतर विद्यार्थिनींनी विचारले. तसेच या चित्रपटाबाबत शिक्षकांनी आपली मते मांडली.
विद्यार्थिनींना हा कार्यक्रम कमीत कमी वेळात खूप काही शिकवून गेला. या कार्यक्रमास उपस्थित असणारे चित्रपटाचे दिग्दर्शक मा. श्री. मिथुनचंद्र चौधरी, सकाळ वृत्तपत्राचे पुणे विभागाचे वितरण अधिकारी मा. श्री. संतोष कुडले तसेच महेश नागरी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडीट सोसायटीच्या जनरल मॅनेजर मा. सौ. माधवी भोंडवे व त्यांचे सहकारी, सकाळचे वार्ताहर मा. श्री. सचिन कोळी व शाळेशी सतत संपर्क साधून ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले ते मा. श्री. अतुल पासलकर ( वितरक प्रतिनिधी ) या सर्वांचे स्वागत शाळेतील जेष्ठ शिक्षिका श्रीमती. विनिता फलटणे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती. सुप्रिया मेरवाडे यांनी केले.
हिंदी परीक्षा
महाराष्ट्र राष्ट्रभाषातर्फे सुबोध व प्रबोध परीक्षा दिनांक २४ व २५ सप्टेंबर २०१६ रोजी घेण्यात आली.
- सुबोध :: सहभागी विद्यार्थिनी - १४
- प्रबोध :: सहभागी विद्यार्थिनी - ०७
हिंदी दिन
दिनांक १७ सितंम्बर २०१६ को हिंदी विभाग की ओर से हिंदी दिन मनाया गया| इस कार्यक्रम का आयोजन छात्राओंद्वारा किया गया| इस कार्यक्रम में हिंदी दिन के बारे में जानकारी दी गई| "चाँद और कवी" तथा "मिटने का अधिकार" इन कविताओंका काव्यवाचन और "सेवा" इस नाटिका का नाट्यवाचन प्रस्तुत किया गया| मा. श्रीमती फलटणे विनिता अध्यापिका जिन्होने छात्राऔं को हिंदी भाषा का महत्व बताते हुए मार्गदर्शन किया| कार्यक्रम का सूत्रसंचालन ८ वी कक्षा की छात्रा यामिनी थेऊरकर इसने किया|
कार्यक्रम समाप्ती के बाद ८ वी कक्षा कि छात्राएँ रोशनी पाटील, प्रतीक्षा नांगरे, मृण्मयी कुलकर्णी इन्होने कार्यक्रमके प्रति अपना मत हिंदी भाषा में व्यक्त किया|
मॅरेथॉन स्पर्धा
बुधवार दिनांक ७/०९/२०१६ रोजी प्रगती फाऊंडेशन तर्फे कात्रज परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १४ वर्षाखालील गटामध्ये हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेतील इयत्ता ८ वी च्या एकूण ४५ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या पैकी इयत्ता ८ वी अ च्या वर्गातील कु. प्रणाली नितीन तिकोणे या विद्यार्थिनीचा सहावा क्रमांक आला.
शालेय स्वच्छता २०१६-१७
हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेमध्ये दिनांक ३०/०८/२०१६ रोजी संपूर्ण शाळा व शालेय परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन शालेय इमारतीतील चौथा व पाचवा मजला तसेच शालेय परिसर स्वच्छ केला. जेष्ठ शिक्षिका श्रीमती. फलटणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. घोडके यांनी कामाचे नियोजन केले. सर्व वर्गांच्या वर्गशिक्षकांनी विद्यार्थिनींचे गट करून वर्गखोली, कपाटे, खिडक्या, दारे स्वच्छ पुसली. कपाटातील अनावश्यक साहित्य बाहेर काढले. चौथ्या व पाचव्या मजल्यावरील स्वच्छतागृह, बेसिन, पॅसेज यांची स्वच्छता कामगांराकडून स्वच्छता करून घेतली. ग्रंथालय स्वच्छते अंतर्गत ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून कपाटाची दारे, काचा स्वच्छ पुसून घेतल्या. स्वच्छ व नीटनेटक्या शाळेच्या आवारात दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती तसेच संस्थेचा वर्धापन दिन साजरा केला.
हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेमध्ये दिनांक १३/०८/२०१६ रोजी संपूर्ण शाळा व शालेय परिसर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती. झोडगे बाई, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. सर्व वर्गांच्या वर्गशिक्षकांनी वर्गातील विद्यार्थिनींचे गट करून वर्गखोली, कपाटे, खिडक्या यांची स्वच्छता केली. शालेय इमारतीतील ४ था व ५ वा मजला स्वच्छ करण्यात आला. ३ -या, ४ थ्या व ५ व्या मजल्यावरील पॅसेज पुसून स्वच्छ करण्यात आला. मा. मुख्याध्यापिकांचे कार्यालय, संगणक कक्ष, ग्रंथालय यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता गृह, प्लेशेड व शालेय आवाराची स्वच्छता सेवकांनी केली. स्वच्छ व नीटनेटक्या शाळेच्या आवारात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात सर्वांनाच आनंद वाटला.
विज्ञान मंडळ
शनिवार दिनांक २७/०८/२०१६ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक प्रशालेत "विज्ञान मंडळाचे" उद्घाटन झाले. हे उद्घाटन आघारकर इन्स्टिटयूटचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गुरुदत्त वाघ सर यांच्या हस्ते झाले. दरवर्षी "विज्ञान मंडळाचे" उदघाटन तांत्रिक पद्धतीने होते. या वर्षीही इयत्ता ८ वी ९ वी च्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या ह्रदयाच्या प्रतिकृतीतून Lighting द्वारे रक्तप्रवाह सुरु करून उद्घाटन केले गेले.
सन २०१६-१७ मध्ये हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत खालील दिवशी वैद्यकीय तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.
मंगळवार दिनांक २२/०८/२०१६ , बुधवार दिनांक २३/०८/२०१६ व शुक्रवार दिनांक २/९/२०१६ - विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीसाठी साई स्नेह हॉस्पिटल कात्रज, पुणे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. इ. ८ वी ते १२ वी च्या एकूण ८२९ विद्यार्थिनींनी या तपासणीचा लाभ घेतला. तसेच या वर्षी १२५ विद्यार्थिनींनी रक्तगट तपासणी व रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण याची तपासणी करून घेतली. यासाठी साई स्नेह हॉस्पिटलने सवलतीच्या दरात तपासणी करून दिली व सर्वसाधारण तपासणीसाठी त्यांनी कोणतेही शुल्क आकारले नाही. तसेच ज्या विद्यार्थिनींना तब्येतीच्या तक्रारी आहेत त्यांना डॉक्टरांनी दिलेला सल्ला पालकांना कळविण्यात आला.
बुधवार दिनांक २६/१०/२०१६ - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ( आरबीएसके ) अंतर्गत औंध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ८ वी व ११ वी च्या विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी केली. तसेच काही विद्यार्थिनींना त्यांच्या शरीरातील क्षार व जीवनसत्वांच्या कमतरता भरून येण्यासाठी औषधे देण्यात आली. तसेच या रुग्णालयातर्फे आयोजित केल्या जाणा-या आरोग्य शिबीरात काही विद्यार्थिनी उपचाराचा लाभ घेणार आहेत.
विविध स्पर्धा
दिनांक १६/०८/२०१६ रोजी इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींची मेंदी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण १६७ विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
दिनांक २२/०८/२०१६ ते १६/०८/२०१६ या काळात रामकृष्ण मठातर्फे स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थिनींना यश मिळाले.
स्पर्धेचे नाव | विद्यार्थिनीचे नाव | इयत्ता व तुकडी | क्रमांक |
इंग्रजी उतारा पाठांतर | कु. पाडे स्नेहा | ९ वी अ | उल्लेखनीय |
संस्कृत सुभाषित पाठांतर | कु. गंधे श्रेया कु. जोशी आनंदी |
८ वी अ ८ वी अ |
उल्लेखनीय |
एकपात्री अभिनय | कु. कामथे आकांक्षा कु. सस्ते मृणाल |
९ वी अ १० वी अ |
उल्लेखनीय उत्तेजनार्थ |
समूहगीत | उत्तेजनार्थ |
दिनांक २३/०८/२०१६ ते ३१/०८/२०१६ या काळात आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा समिती पुणे तर्फे उतारा पाठांतर ( मराठी, हिंदी, इंग्रजी ) कविता पाठांतर ( मराठी, हिंदी, इंग्रजी ) नियोजित भाषण ( मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत ) मराठी समयस्फूर्त भाषण या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये २८ विद्यार्थिनी सहभागी झाल्या. कृषी व सहकार व्यासपीठ पुणे तर्फे राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेत कु. मयुरी गर्जे व सिया वीर इयत्ता ९ वी ब या दोन्ही विद्यार्थिनींना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
शास्त्रज्ञ आपल्या भेटीला
विज्ञान विभागाअंतर्गत गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही सन २०१६-१७ मध्ये आपण शास्त्रज्ञ आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला. या उपक्रमअंतर्गत "आघारकर इन्स्टिटयूटच्या" जेष्ठ शास्त्रज्ञांनी येऊन इयत्ता ९ वी व १० वी च्या विद्यार्थिनींना पुस्तकातील पाठाचे अध्यापन व इतर अद्ययावत गोष्टींचे मार्गदर्शन केले. या वर्षी खालील प्रमाणे जेष्ठ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
२२ व ३० जुलै, २० ऑगस्ट २०१६ - डॉ. गुरुदत्त वाघ सर
२३ जुलै २०१६ - डॉ. वाघोले सर
१९ ऑगस्ट २०१६ - डॉ. बोडस सर
स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट २०१६, स्वतंत्र भारताचा ७० वा स्वातंत्र्य दिन हुजूरपागा कात्रज माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेमध्ये साजरा करण्यात आला. या कार्याक्रमासाठी सर्व विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यपिका मा. श्रीमती. सीमा झोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बँड पथकाने लयबद्ध वाजवलेल्या राष्ट्रगीताच्या सुरात विद्यार्थिनींच्या खड्या आवाजातील राष्ट्रगीताचे सूर मिसळले आणि अंगावर रोमांच उभे राहिले. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनींनी “मंजिल तेरे पद चुमेगी आज नही तो कल” हे गीत तर प्राथमिक विभागातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर केले. माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी “एकता, स्वतंत्रता, समानता रहे" हे गीत सादर केले. चंद्रसूर्य रंगमंच्याद्वारे आयोजित देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत प्राथमिक विभागातील शिक्षकांनी तृतीय क्रमांक मिळविला. ते गीत “ये धरती हिंदुस्तान की” सादर केले. प्राथमिक विभाग शालेय मंत्रिमंडळ अध्यक्ष कु. आदिती किंद्रे तर माध्यमिक विभाग शालेय मंत्रिमंडळ अध्यक्ष कु. कोमल उणेचा ह्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद, देशाच्या विकासात युवापिढीचे व शिक्षणातून होणाऱ्या संस्काराचे महत्त्व आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून विषद केले. सर्व विद्यार्थीनींना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अनेक पालक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
विद्यार्थिनी शिक्षक दिन अहवाल
मंगळवार दिनांक ०६/०८/२०१६ रोजी विद्यार्थिनी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाच्या निमित्ताने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींनी अध्यापनाचे काम केले. इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनींनी शिक्षकेतरांचे काम पहिले. एकूण ४५ विद्यार्थिनींनी या विद्यार्थिनी शिक्षक दिनामध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. या दिवशी उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विद्यार्थिनी शिक्षिकेला आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. या वर्षी इयत्ता १० वी ब मधील कु. शिंगवी वैष्णवी सचिन या विद्यार्थिनीस पुरस्कार देण्यात आला. तसेच पालक शिक्षक संघ कार्यकारिणी तर्फे सर्व शिक्षक व शिक्षकेतरांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पालकांनी हुजूरपागा शाळा व शिक्षक शिक्षकेतरांबद्दलच्या सद् भावनाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. अल्पोपहाराचा आस्वाद घेत या दिवसाची सांगता झाली.
गुरु पौर्णिमा
मंगळवार दिनांक १९/७/२०१६ रोजी आपल्या प्रशालेमध्ये "गुरुपौर्णिमा" साजरी करण्यात आली. आपल्या गुरुप्रती असलेला आदर व स्नेह व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनींनी या कार्याक्रमाचे आयोजन केले होते. प्रत्येक शिक्षकाविषयी वाटणारा आदरभाव त्यांनी स्वत: तयार केलेल्या छोट्या - छोट्या कवितांमधून व्यक्त केला. प्रशालेमधील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थिनींनी श्रीफळ देऊन सत्कार केला.
स्वराज्य सभा
राष्ट्र सक्षम घडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. लोकशाहीची मूल्ये शिक्षणातूनच रुजली जावीत आणि त्यातून नेतृत्व, राष्ट्रप्रेम, समाजाभिमुखता इ. मूल्यांची बीजे विद्यार्थिनींमध्ये रुजावीत या हेतूने लोकशाही व्यवस्थेची माहिती करून देण्याच्या उद्देशाने गेली ५१ वर्ष हुजुरपागेत सुरु असलेला ‘स्वराज्यसभा’ हा उपक्रम!
शालेय मंत्रिमंडळ हा एक अभिनव प्रकल्प! प्रत्येक वर्गातून ४ विद्यार्थिनी उमेदवार निवडणुकीसाठी उभ्या राहतात. गुप्त मतदानाद्वारे त्यातील २ विद्यार्थिनींची प्रतिनिधी पदासाठी निवड केली जाते. त्यातूनच साकारले जाते आमचे शालेय मंत्रिमंडळ.
मग पार पडतो तो आमच्या या “शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी कार्यक्रम”.
हा कार्यक्रम शनिवार, दि. १६ जुलै २०१६ रोजी पुण्यनगरीचे प्रथम नागरिक मा. महापौर श्री. प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आमच्या म. ग. ए. संस्थेचे उपाध्यक्ष, मा. श्री. का. बा. पारखी सर, माध्यमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती. सीमा झोडगे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमती. रंजना नाईक, सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश कदम, उपशिक्षणाधिकारी श्रीमती. संध्या गायकवाड, माजी नगरसेविका श्रीमती. रत्नप्रभा जगताप हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मा. श्रीमती. सीमा झोडगे यांनी मंत्रिमंडळातील विद्यार्थिनींना मंत्रीपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर मावळत्या मंत्री मंत्रिमंडळास प्रशस्तिपत्रके देऊन निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रशांत जगताप यांनी सर्व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना नेतृत्वगुणांची गरज, लोकशाही व्यवस्थेचे महत्व, जबाबदार नागरिकत्वाचे हक्क व कर्तव्ये सांगताना, ‘जया अंगी नेतेपण तया यातना कठीण’ असे सांगत आपल्यावरील जबाबदारीची जाणीव ही करून दिली.
या मंत्रिमंडळातील आमच्या प्रतिनिधी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंतप्रधान, उपपंतप्रधान ही पदे व सांस्कृतिक, शिस्त, स्वच्छ्ता, पर्यावरण, वाचनालय इ. खाती निष्ठेने व कार्यतत्परतेने सांभाळतात.
“ज्ञानकलेच्या रम्य मंदिरी,
लोकशाहीचा पाठ गिरवूया”.
हि उक्ती आमची शाळा खऱ्या अर्थाने सार्थ करते.
पालक सभा
शाळा आणि पालक यांच्यात सुसंवाद होऊन त्यायोगे विद्यार्थिनींची प्रगती साधण्यासाठी पालकसभा आयोजित केल्या. यामध्ये मूल्यमापन पद्धती वर्षभरातील उपक्रम, सहली, शालेय शिस्त, उपस्थिती, विद्यार्थिनींची संपूर्ण माहिती असलेले जनरल रजिस्टर यासंबंधीची माहिती पालकांना देण्यात आली. मा. मुख्याध्यापिकांनी आपल्या पाल्याची मानसिकता ओळखूनच तिच्या प्रगतीच्या दृष्टीने काय करता येईल याचे मार्गदर्शन पालकांना केले.
पालक कार्यकारिणीसाठी प्रत्येक वर्गातून पालक सदस्यांची निवड करण्यात आली.
सन २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षातील पालकसभांचे आयोजन खालीलप्रमाणे केले गेले.
१२ वी - २८.०६.२०१६
१० वी - ०१.०७.२०१६
९ वी - ०४.०७.२०१६
८ वी - ०५.०७.२०१६
वृक्षारोपण कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे म. ग. ए. सोसायटीच्या वतीने संस्थेने घेतलेल्या मांगडेवाडी येथील नवीन जागेवर शुक्रवार दि. १ जुलै २०१६ रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी म. ग. ए. संस्थेच्या अध्यक्षा मा. जयश्रीताई बापट, संस्थेच्या सभासद मा. विनया देशपांडे, मा. श्रीमती. हिमानीताई गोखले, म. ग. ए. संस्थेचे सभासद कात्रज इंग्रजी माध्यम शालेय समितीचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष महाजन सर तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. प्रकाशभाऊ कदम, प्रभाग क्र. ७६ च्या नगरसेविका मा. भारतीताई कदम, धनकवडी प्रभाग समितीचे अध्यक्ष मा. अभिजितदादा कदम, नगरसेविका कल्पना ताई थोरवे, मोहिनीताई देवकर त्याच बरोबर कात्रज शाळेतील सर्व विभागांच्या मा. मुख्याध्यापिका, लक्ष्मी रोड सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनी, कात्रज माध्यामिक शाळेतील समाजसेवा व गाईड च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या प्रसंगी चाफा, करंज, कडूनिंब या झाडांची रोपे लावण्यात आली.
Explore : मोकळे व्हा!
इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींमध्ये रोजच्या जीवनात जगण्यासाठी त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या साठी Explore मोकळे व्हा! हा आगळा वेगळा उपक्रम या वर्षी राबविण्यात आला. हा उपक्रम एच. एच. सी. पी. हुजूरपागा लक्ष्मी रोड शाखेतील माजी विद्यार्थिनींनी घेतला. यामध्ये त्यांनी माजी विद्यार्थिनी व इयत्ता ९ वी च्या विद्यार्थिनींचे गट करून, निरनिराळे खेळ घेऊन गोष्टी, अनुभव सांगून प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींमध्ये नाट्याभिनय, वक्तृत्व सभाधीटपणा, लेखन कौशल्य वाढीस लागावे, त्यांना हिशेब, आर्थिक व्यवस्थापन करता यावे या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केलेली होती.
क्रीडा अहवाल
पुना गर्ल्स स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धेत आपल्या प्रशालेने खालील प्रमाणे यश मिळविले.
८०० पेक्षा कमी गट :
एकूण सहभागी शाळा – १९
द्वितीय क्रमांक
योगासन
एकूण सहभागी शाळा – १९
द्वितीय क्रमांक
कु. कोमल उणेचा हिस सूर्यनमस्कार स्पर्धेत "उत्कृष्ट संघनायिका" पुरस्कार मिळाला.
पुरस्कार
म. ग. ए. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सर्व विभागाच्या नियतकालिक स्पर्धेत आमच्या "फुलोरा" या नियतकालिकास द्वितीय क्रमांक मिळाला. श्रीमती. शकुंतला ताई नवाथे यांच्या तर्फे त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा "उपक्रमशील शिक्षक" हा पुरस्कार आमच्या प्रशालेतील शिक्षिका श्रीमती. सुप्रिया मेरवाडे यांना मिळाला.
आंतरराष्ट्रीय योग दिन
बुधवार दिनांक २१/०६/२०१७ रोजी हुजूरपागा कात्रज माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी योगासने व ध्यान या संदर्भात Art of Living च्या योग शिक्षिका श्रीमती हर्षिता राणा यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या सहकारी श्रीमती मानसी वडसारीचा व कविता खंडागळे यांनी प्रात्यक्षिके करून दाखविली.
इयत्ता ९ वी ब च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला व योगाचे शरीरिक, मानसिक स्वस्थासाठीचे महत्व जाणून घेतले.